व्यक्तिरेखा
- RGDian
- Feb 6, 2021
- 3 min read
Updated: Feb 9, 2021
श्रीमंत रामराव गणपतराव देशमुख उर्फ आर.जी.देशमुख
जन्म :- २२ डिसेंबर १८९१ , मृत्यू :- २२ जानेवारी १९६०
संस्थापक अध्यक्ष :
श्रीराम लिटररी इंडस्ट्रीयल अँन्ड़ अँग्रीकल्चरल एज्युकेशन सोसायटी ,
चांदस वाठोडा ता.वरुड जि.अमरावती

१९५१ मध्ये विश्वस्त मंडळ (TURST) बनवून याच संस्थेवर श्रीराम दुर्गादेवी संस्थान संस्था निर्माण केली. शिक्षण संस्थेला चाळीस एकर आणि श्रीराम दुर्गादेवी संस्थान सव्वासे एकर जमीन दान केली .
दादासाहेब आर.जी.देशमुख सात आठशे एकर जमिनीचे धनी. मालगुजार इंग्रज सरकार कडून लावाजम्याचे धनी.
साधी राहणी, उच्च विचार. वाचनाचा भारी शौक,स्वत:चे श्रीराम वाचनालय तीनेक हजार पुस्तके आणि मासिके. मराठी, हिंदी, इंग्रजी. धार्मिक, कादंबरी, नाटक, इतिहास, वाड:मय, न्यायबोध, कल्याण मनोहर,स्त्री उद्यम, निरोगधाम, चांदोबा मासिके नियतकालिके. नियमित एक दोन वर्तमानपत्रे. केसरी, तरुणभारत पोस्टाने येत. दादासाहेबांचा स्वत:वाचनाचा व्यासंग जोरदार.इंग्रजी आकलन क्षमता असलेले व्यक्तिमत नाटकाचा भारी लळा. जयमाला शिलेदार, पाटणकर संगीत नाटक मंडळी पुण्याची दरवर्षी मुक्कामाला वाड्यात, पंधरा पंधरा दिवस मुलांची नाटके स्वत: तालीम घेवून बसवत. श्रीराम दुर्गादेवी ट्रस्ट तर्फे दुर्गात्सव, रामनवमी, नवरात्री कथा, कीर्तने, महाप्रसाद. दरवर्षी गोविंदराव दलाल कीर्तनकार,कीर्तनाची मेजवानी दररोज.रोजचे एक आराज्यान ऐतिहासिक पारंपारिक.
रामराव गणपतराव देशमुख नामांकित शिक्षणमहर्षीच्या डॉ.पंजाबराव देशमुख,कर्मवीर भाऊराव पाटील अशा सारख्यांच्या पंक्तीत बसण्याची योग्यता भलेही नसेल.परंतु त्यांची दूरदृष्टी त्याकाळातील अनेकांची भविष्य घडवून गेली.चाळीस एकर जमीन संस्थेला दान केली.सोने शंभर रुपये तोळा असतंना पाच वर्ष दरमहा सहाशे रुपये शिक्षकांच्या पगाराची सोय करीत.
जरुडकर बाबासाहेब देशमुख, बहादेकर पाटील आणि हे रामराव गणपतराव देशमुख वाठोडकर १९२४ साली वरुडची न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केली. १९३२ मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख भाऊसाहेबांच्या शिवाजी शिक्षण संस्थेत विलीन केली. तोपर्यंत या तिघांनी चालीविली.यांना स्वत:च्या वारसाची भविष्ये कमी पडू वाटलेच नाही कधी,
साधी माणसे ध्येयवेडी,या तीनही सोबत्यावर प्रभाव होता. डॉ.पंजाबराव देशमुखचा.अनेक महाभागांचा. कायदे पंडितांचा, समाज सेवकांचा.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा. ज्योतीराव फुल्यांचा, सावित्रीबाई फुलेचा अभिमान वाटतो रामाराव गणपतरावांचा!
श्री. गोपाळराव नामुजी पाटील (धोटे)
- जी. एन . पाटील (नागपूर)
रामराव गणपतराव देशमुखांचे भाचे. डॉ.बाबुराव पाटलांचे मोठे बंधू ,
फिजिकल एज्युकेशन टीचर युनिव्हर्सिटी ट्रेनिंग कॉलेज नागपूर,
प्रभा निवास गिरीपेठ नागपूर.
बी.ए.नंतर पटियाला येथून फिजिकल एज्युकेशन डिग्री प्राप्त. संस्थापक व्यवस्थापक श्रीराम लिटररी इंडस्ट्रीयल अँन्ड़ अँग्रीकल्चरल एज्युकेशन सोसायटी चांदस वाठोडा युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये पदवीधर शिक्षकांसाठी बी.टी.बँचलर आँफ टीचिंग (आताचे बी.एड.) १वर्ष आणि एम.एड.२ वर्ष.
हा चांदस वाठोड्यात जन्मलेला माणूस पदवीधर आणि व्दिपदवीधर.विद्यार्थ्यांना फिजिकल एज्युकेशन थेअरी आणि प्रँक्टीकल शिकवायचा.एवस्ट्र कॉलेज अँक्टीव्हीटीज त्यांच्याकडे असल्यामुळे निरनिराळ्या समारंभात आणि शिक्षणिक टूरचा सूत्रधार म्हणून जबाबदारी.
जी.जी.देसाई डेप्युटी कलेक्टर यांची कन्या कु.प्रभाताई यांच्याशी आंतरजातीय विवाह साधारणत :१९३० मध्ये. अँडमिनिस्ट्रेशन असतांना पंधरा वीस नार्मल स्कूल ट्रेन्ड शिक्षकांना.बैतुल आणि छिंदवाडा जिल्ह्यातून आणून.नागपूर महानगर पालिकेमध्ये नोकरीला लावले.साधारणत: १९४५ पासून. क्षत्रिय लोणारी कुणबी समाज नागपूरचे अध्यक्ष असतांना गृहबांधणी संस्था स्थापन करून प्रताप नगर आणि शिक्षकांच्या कॉलनी स्थापन केल्या.
२७ एप्रिल १९६५ रोजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषीमंत्री भारत सरकार यांच्या तेरावी निमित्य कार्यक्रमासाठी घरून निघतांना हृद्य घाताने मृत्यू. पत्नीचे पाच वर्षापूर्वीच निधन. मुलेबाळे झालेच नाही.शल्य बाळगत राहिले जन्मभर.१९५६ साली मी डीटीपी ट्रेनिंग.१९५८ साली श्री.कहालाकर बी.टी.ला त्यांचेच विद्यार्थी. १९६२ साली संस्थेचा राजीनामा देऊन निघून गेले.चांदस वाठोडयात मग कधीच आले नाहीत.
डॉ.सूर्यभान धोटे (एम.बी.धोटे)
डी.एम.पी.,एल.एम.पी. मध्यप्रदेश
छिंदवाड्याच्या टी.बी.हॉस्पिटल मेडिकल ऑफिसर पदावरून सेवानिवृत्त
टी.बी.कंट्रोलिंग प्रोग्राम तशस्वीरीत्या राबविल्याबद्दल मध्यप्रदेश शासनाकडून राज्यपालाच हस्ते ताम्रपत्र प्राप्त. छिंदवाडा टी.बी.हॉस्पिटलच्या आवारात लोकवर्गणीतून भव्य धर्मशाळा बांधली, त्याकरिता भव्य सत्काराचे धनी. सेवानिवृत्तीनंतर चांदस वाठोडा येथे वास्तव्य,शेती आणि समाजकार्य. वाठोडा विठ्ठल मंदिर परिसरात भव्य सभागृहाचे बांधकाम लोकवर्गणीतून.श्री.संतोषराव गणपतराव उर्फ एस.जी. ठाकरे भाऊसाहेब आणि डॉ.एस.बी.धोटे जोडीने.
डॉ. भानुदास तुकारामजी देशमुख - चांदस
MVSC Ph.d
महाराष्ट्र शासन सेवा निवृत्तीपर त्रिपुरा शासनाचे तज्ञ सल्लगार.सध्या वास्तव्य मुंबई. घर व शेती चांदसला .
कै.श्री.मारोतराव भानजी देशमुख चांदस
(एम.बी.देशमुख)
निस्सीम सनदी अधिकारी.सेवानिवृत्त उप-जिल्हाधिकारी नागपूर
कै.आत्माराम शंकरजी दवंडे
सेवानिवृत्त शिक्षक
मुंबईहून मूर्तीकला शिकून आले होते. गणपतीच्या आणि इतर मूर्ती हुबेहूब बनवीत.
श्री.अरविंद शेषराव साबळे
MSc Agri Ph.d
सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
डॉ.वामनराव शामरावजी पवार
MSc Agri Ph.d
सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
कै.शंकरराव कान्होजी दळवेकर
कथेकरी बुवा म्हणून प्रसिध्द,डफ,डायका,तुणतूण लयबध्द साथीन तासन तास मनोरंजन करीत.
कै.आनंदराव उंद्राजी चोबितकर
चांदस वाठोडा आणि वरुड
चांदस वाठोडयामध्ये देशभक्तीची बिजे रुजवणारा अग्रसेनानी,सच्चा समाजसेवक,नाटकाचा दक्ष.जवाहर कॉटन विद्यामंदिर वरुडचा संस्थापक आणि चालक.विठ्ठलराव गणपतराव देशमुख चांदस वाठोडा यांचे समवेत नंतर वरुड म्युनिसिपलला हस्थांतरित.
वरुड नगरीत महात्माजी म्हणून प्रसिध्द चळवळ्या,प्रेरणा देणारा,इतरांही.वरुड कॉग्रेस कमिटी तर्फे प्रभात फेरी,गीते,ग्रामसफाई हाती झाडू घेवून गल्ल्या झाडायचे.नंतर लोकही सामील व्हयाचे झाडू घेवून.जिनिंग आणि प्रोसिंगच्या धंद्यात कापूस खरेदी तज्ञ.
सावित्रीच्या लेकी - चांदस वाठोड्याच्या
चांदस वाठोडयाच्या ज्ञानाच्या भुकेचा वसा, इतिहास घडविणारा. ऐशी वर्षापूर्वी जन्म घेतलेल्या या सावित्रीच्या लेकी चांदस वाठोडयातजन्मलेल्या. शिक्षकी पेशाचे व्रत घेतलेल्या...
१) कै.शांताबाई राघोजी सकर्डे (धुडे) नागपूर शिक्षिका
२) कै.वेणूबाई भानजी दवंडे (बारस्कर) गव्हर्मेंट कन्या शाळा मोर्शी
३) श्रीमती बाळकृष्ण मोदी (बेलसरे) शिक्षिका नगपुर काँर्पोरेशन
४) गयाबाई मोतीरामजी देशमुख (गावंडे) शिक्षिका नगपुर काँर्पोरेशन
५) शांता माधवराव देशमुख (बारस्कर) शिक्षिका नगपुर काँर्पोरेशन
६) प्रभाताई नत्थुराव पवार (देशमुख) शिक्षिका अमरावती जिल्हा परिषद
७) कै.वेणूताई नत्थुराव पवार (देशमुख) शिक्षिका अमरावती जिल्हा परिषद
८) कै.गोदुताई गणपत देशमुख (पारखे) शिक्षिका नगपुर काँर्पोरेशन
९) कै.राधाताई गणपराव देशमुख (धोट) शिक्षिका अमरावती जिल्हा परिषद
१०) विमल बाळकृष्ण मोदी (गाडेकर) शिक्षिका नगपुर काँर्पोरेशन
११) ललिता बाळकृष्ण मोदी (शेंडेकर) शिक्षिका यवतमाळ जिल्हा परिषद
१२) लीला नारायण धामंदे शिक्षिका यवतमाळ जिल्हा परिषद
१३) माया विश्वनाथ दिवे शिक्षिका भंडारा जिल्हा परिषद
लेखन: श्री. रं. वा . खाडे , माजी मुख्याध्यापक , आर.जी.देशमुख कृषि विद्यालय
Chandas | Wathoda | Ramrao Ganpatrao Deshmukh | Gopalrao Namuji Patil | Dr. Surybhanji Dhote | Bhanudas Tukaramji Deshmukh | Atmaram Shankarji Davnde | Arvind Sabale | Wamanrao | Savitrichya LekiPawar
Comments