top of page

बलभीम व्यायाम मंदिर - चांदस

Updated: Mar 15, 2021

‘शरीर बलवान, तर मन बलवान ’


कै.आनंदराव चोबितकर उर्फ महात्माजी यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांनी श्रमदानातून आखाडा तयार केला. तोच पुढे बलभीम व्यायाम मंदिर म्हणून नावारूपास आला. स्वामी शिवानंद महाराज, वरुड यांचे हस्ते या वस्तूची स्थापना झाली.


कै.बळीरामजी देशमुख यांनी जागा दान केली. कुस्ती मलखांब, लाठीकाठी इत्यादी व्यायामाचे प्रकार सुरु झाले. त्यात दोन्ही गावातील कुस्तीगीर आणि शौकीनांनी आकर्षणाचे केंद्र बनविले. मनोरंजनाची इतर साधने नसल्यामुळे नवीन पिढी शरीर बलदंड करण्याकरीता आकर्षिली गेली. कै.महादेवराव चोबितकर, कै.पर्बातराव कानाठे, कै. शामरावजी निंबुरकर, कै.महादेवराव बोंबले, कै.पर्बातराव दळवेकर , चांदस - वाठोडयाच्या व्यायाम शाळेचे मल्ल म्हणून चमकले.


(Credit: Dr. Narhari Nimburkar)


प्रोफेसर कै. शामराव देशमुख यांनी आपल्या कला गुणांनी शक्तीच्या प्रयोगाव्दारे चांदस - वाठोडयाच्या बलभीम व्यायाम मंदिराची छाप निर्माण केली. छातीवर घणाने मोठा दगड फोडणे, तलवार छातीवर ठेवून त्यावरून चार चाकी किंवा ट्रक नेणे, छातीने गाडी चारचाकी अडविणे, जमिनीतील खड्ड्यात एक तास किंवा अधिक वेळ समाधिस्त होणे. मुलताई, वरुड आणि इतर ठिकाणीही आपल्या शक्तीचे प्रयोग विठ्ठलमूर्तीनी केले.


 

लेखन: श्री. रं. वा . खाडे , माजी मुख्याध्यापक , आर. जी. देशमुख कृषि विद्यालय

 

Balbhim Vyayam mandir | AAkhada | Chandas | Professor Vithhalmurti | Anandrao Chobitkar | Mahatmaji | Balbhim Vyayam Mandir

Comments


bottom of page