top of page

#कोरोना

Updated: Aug 7, 2020


खर तर या विषयावर लिहायची माझी मुळीच इच्छा नव्हती कारण सर्वत्र आता चर्चेचा एकच विषय उरलाय तो म्हणजे #कोरोना . त्यात मी आणखी आपला फाफटपसारा लावण.



सर्व कसं थांबल्या सारखं झालंय , रस्ते अगदी मोकळे झालेत , विनाकारण होणार प्रदूषण पण थांबल. आणि आपण घरात थांबलोय , त्यामुळे आपल्यातले गुण मात्र एक एक आपल्यालाच दिसायला लागलेत , आता आपण खर जगणं जगतोय ते आपल्यासाठी .... ते #वर्क_फ्रॉम_होम वगैरे सर्व अंधश्रद्धा असते हो .


काही मित्र निवांत आपापल्या घरी गेलेत गावाला , मी अडकलोय इकडे पुण्यात , एकटा असलो तरी माझे मित्र - मैत्रीणी , माझा परिवार मला एकट कधीच वाटू देत नाहीत . सतत सर्वांचे फोन मेसेजेस येत असतात रोज विचारणा होते. कसा आहेस काय आहेस, जेवणाचं काय ? सर्व सर्व ... एवढे काळजी करणारे सोबत असल्यावर कुठे काय होईल हो कारोना- बिरोना .


शिवाय मी माझी काळजी घेत आहोच म्हणा, सांगायचं एवढंच की तुम्ही पण काळजी घ्या तुमची आणि परिवाराची , हा काळ खूप काही शिकवण देणारा आहे. कदाचित पुढील पिढीला काही स्वच्छ आणि निर्मळ काहीतरी देण्याचा .....!


हे ही दिवस जातील एवढीच एक आशा ......!



 
 
 

Opmerkingen


bottom of page