सहज..
- Bhagyesh Kadu
- Jul 22, 2020
- 1 min read
आज पुन्हा काही तरी फोनवर बघितले आणि पुन्हा खूप थोडा किंवा खूप काही छोटया-छोटया गोष्टी बद्धलचा दृष्टीकोन बदलला. नाही म्हणजे, अस सहसा होत नाही त्या गोष्टींचा संबंध आपल्या कुठल्या तरी गोष्टींशी जुळला असतो किंवा तो न सांगताच जुळला जातो, जे काही होतंय ते आपल्या सोबत सुध्दा होतंय आणि त्याचा होणारा शेवट जसा असणार तसाच आपलाही! हो मानतो सगळ्याच गोष्टीचां शेवट मनाप्रमाणे किंवा आपल्याला हवं तसाच होतो अस नाही. पण होणाऱ्या गोष्टीचा किती तरी पटीने अंदाज बांधता येतो. अस बघता बघता काही तरी त्या मध्ये आपण रमून जातो आणि त्याच्या कथेतून आपण आपली कथा आणि तिचा शेवट बघतो. टेलिव्हिजन आणि अनेक नाटके किंवा काही चित्रपटे ह्यात सगळ्याच गोष्टीचा शेवट असा आनंदी आणि सुखदायी असतो ज्यांना जो हवा त्याना तो/ती मिळते.
बॉलीवूड च्या चित्रपटसृष्टीठ मी जन्मलो तर नक्कीच त्याचा माझ्यावर प्रभाव असणारच, हिरोलाच हिरोईन मिळणार आणि ते आताही होतच त्यात नवल करायचं काही नाही, पण त्या जगावेगळं पण एक वेगळंच जग आहे त्यात असल्या गोष्टीं होत नाही , होतही असेल पण माझ्या सोबत अजून झाल्या नाही. आणि आपण इकडे अश्या अपेक्षा ठेवून चालत नाही.कारण
अपेक्षा भंग झाल्या किंवा अपुर्ण राहिल्या तर माणूस सावरतो, याउलट त्या पूर्णच होणार नाही ह्याची कल्पना जर आधीच जगजाहीर झाली असणार तरीही त्या साठी आपण प्रयत्न करावे नि करतोय हा एक प्रकारचा मूर्खपणाच.
Commentaires